Talathi Exam Info

3165 पदांसाठी लवकरच तलाठी भरती

3165 पदांसाठी लवकरच तलाठी भरती महसूलमंत्री थोरात यांची विधानसभेत घोषणा.राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण पाहता राज्यातील ३ हजार १६५ तलाठी पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

खाली दिल्याप्रमाणे अधिक तपशील वाचा.

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

अॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी इचिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यःस्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.

Talathi Bhrati Exam Information—-https://jobtodays.com/talathi-recruitment-information/

Question papers—- https://jobtodays.com/talathi-2022-question-papers-download/

Bharati Syallabus—http://jobtodays.com/maharashtra-talathi-bharti-syllabus-2/

Talathi Bharti 2022,Talathi Mega Recruitment 2022,Talathi Bharti 2022 ,महाराष्ट्र तलाठी भरती 2022,

तलाठी भरती 2021 जाहिरात,तलाठी भरती पात्रता,तलाठी भरती 2021 अभ्यासक्रम,तलाठी भरती 2022 जाहिरात,तलाठी भरती प्रश्नपत्रिका,Maharashtra Talathi Recruitment  2022,Talathi bharti time table 2022,तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती,Talathi Bharti Exam Information,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *