टी सी एस आय बी पी एस पॅटर्न वनरक्षक भरती 30 प्रश्नपत्रिका
मनोगत मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागामार्फत वनरक्षक पदभरतीसंबंधी कार्यवाही सुरू असून लवकरच जाहिरात येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रचंड स्पर्धेत आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, प्रश्नांचे स्वरूप लक्षात येण्यासाठी आणि अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊनच, वनरक्षक ३० प्रश्नपत्रिका यासंदर्भात- पहिल्या विभागात सन २०१९ मधील २३ ऑनलाइन प्रश्नपत्रिका संस्करित स्वरूपात दिलेल्या आहेत. कालबाह्य प्रश्नांत आगामी परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील असे बदल केले आहेत. “आगामी परीक्षेचा विचार करून चालू घडामोडीवरील प्रश्नांचे अद्ययावत संदर्भ देखील दिलेले आहेत. दुसऱ्या विभागात ‘TCS पॅटर्न’ वर आधारित ७ सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. यामध्ये काही निवडक प्रश्नांची स्पष्टीकरणेही दिलेली आहेत.
Reviews
There are no reviews yet.